आमच्या विषयी

About Us

अपूर्व यात्रा टूर्स आणि ट्रॅव्हल्स

आपले हातपाय धडधाकट आहेत कुठलाही शारीरिक त्रास नाही ,तोपर्यंतच आपण यात्रा कराव्यात व यात्रेचा आनंद घ्यावा व्यवहारिक जीवनामध्ये थोडासा बदल म्हणून व ऊर्जा मिळवण्याचा साधन म्हणून यात्रा केल्या जातात ,तर अध्यात्मिक क्षेत्रामध्ये भगवंताने धारण केलेल्या अवतार व भगवंताच्या प्राप्ती करता ज्यांनी जीवन समर्पित केलं असे असणारे संत महात्मे यांच्या जन्मभूमीमध्ये लीला भूमीमध्ये जाऊन त्या कार्याचे दर्शन घेण्याची संधी दर्शन घेण्याचा योग म्हणजेच तीर्थयात्रा करणे होय ,कालानुरूप तीर्थयात्रेमध्ये बदल होत गेले पूर्वी पायी केली जाणारी तीर्थयात्रा आता विविध साधने वापरून केले जाते, यामध्ये वेळेची व श्रमाची बचत तर होतेच शिवाय सुखदायी प्रवास होतो व आनंद मिळतो याच हेतूने केवळ फिरणं नव्हे तर आनंददायी यात्रा व्हावी हा हेतू मनामध्ये ठेवून अपूर्वयात्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीची स्थापना करण्यात आली.


जवळ हे सगळं सिद्ध आहे |

हात चालावया पाय| 

तव तू आपले स्वहित पाहे| 

तीर्थयात्रे जाय चुकू नको|| 

जगद्गुरु संत तुकोबाराय या अभंगातून सर्व सामान्य लोकांना तीर्थयात्रा करण्याचा उपदेश करतात, की जोपर्यंत आपले हातपाय धडधाकट आहेत कुठलाही शारीरिक त्रास नाही ,तोपर्यंतच आपण यात्रा कराव्यात व यात्रेचा आनंद घ्यावा व्यवहारिक जीवनामध्ये थोडासा बदल म्हणून व ऊर्जा मिळवण्याचा साधन म्हणून यात्रा केल्या जातात ,तर अध्यात्मिक क्षेत्रामध्ये भगवंताने धारण केलेल्या अवतार व भगवंताच्या प्राप्ती करता ज्यांनी जीवन समर्पित केलं असे असणारे संत महात्मे यांच्या जन्मभूमीमध्ये लीला भूमीमध्ये जाऊन त्या कार्याचे दर्शन घेण्याची संधी दर्शन घेण्याचा योग म्हणजेच तीर्थयात्रा करणे होय ,कालानुरूप तीर्थयात्रेमध्ये बदल होत गेले पूर्वी पायी केली जाणारी तीर्थयात्रा आता विविध साधने वापरून केले जाते, यामध्ये वेळेची व श्रमाची बचत तर होतेच शिवाय सुखदायी प्रवास होतो व आनंद मिळतो याच हेतूने केवळ फिरणं नव्हे तर आनंददायी यात्रा व्हावी हा हेतू मनामध्ये ठेवून अपूर्वयात्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीची स्थापना करण्यात आली. यामध्ये या कंपनीच्या संस्थापिका सौ. गीतांजलीताई झेंडे कुलकर्णी या महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला कीर्तनकार असून सुमारे दीड तप अर्थात अठरा वर्षे वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाची परंपरा त्या चालवतात बालवयापासून जीवनावर झालेले वारकरी संस्कार व संगीत क्षेत्राची विशेषता गायनाची असणारी आवड यासोबतच त्यांना त्यांच्या वडिलांचे लाभलेले मार्गदर्शन यामुळे अगदी कॉलेजच्या वयापासून गीतांजलीताई कीर्तन करत आहेत, सुंदर गायनाचा आवाज व धारदार वक्तृत्व आवेश पूर्ण बोलणं व शिवचरित्राचा गाढा अभ्यास यामुळे सौ गीतांजलीताई महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरही शिवचरित्र व्याख्यात्या म्हणून प्रसिद्ध आहेत. झी टॉकीज , मराठी बाणा ,स्टार प्रवाह आदी वाहिन्यांवरूनही त्यांचे कार्यक्रम नियमित प्रसारित केले जातात, सामाजिक क्षेत्रामध्ये बदल घडवण्याचं महत्त्वाचं कार्य त्याचबरोबर अध्यात्मिक व धार्मिक पातळीवरती समाज प्रबोधन करून जागृती निर्माण करणे व परमार्थ मार्गास उपयुक्त ठरेल असं वातावरण निर्माण करणे हे गीतांजलीताई यांनी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कार्य केलेलआहे ,आणि याच कार्याचं फलस्वरूप म्हणून त्यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2013 सालामध्ये प्रदान करण्यात आला, एवढेच नव्हे तर पुणे येथील संगीतोन्मेष नावाच्या संस्थेतर्फे दिला जाणारा वारकरी संगीतरत्न हा पुरस्कार दिला गेला आहे ,अनेक छोटे-मोठे सन्मान देऊन त्यांना गौरविले आहे कथा कीर्तनाच्या माध्यमातून तीर्थयात्रेचे महिमान सांगत असताना अनेक भाविक आम्हालाही आपल्या सोबत यात्रेला यायचे आहे अशी विनंती करतात आणि या माध्यमातून आपणही यात्रा करावी व आपल्या सोबत इतरांनाही खऱ्या अर्थाने अध्यात्मिक यात्रा घडावी या हेतूने या यात्रा कंपनीची स्थापना करण्यात आली आहे, वर्षभराच्या अतिशय व्यस्त जीवन शैलीतून धावपळीतून स्वतः करता वेळ काढून ताई या यात्रेमध्ये सहभागी होतात व सोबत येणाऱ्या यात्रेकरूंच्या मनामध्ये अध्यात्मिक भावना जागृत करतात ,ताईंच्या समवेत यात्रा करण्याचे भाग्य लाभणे म्हणजे एक विशेष पर्वणी आहे .ताईंचे ओजस्वी वक्तृत्व ऐकण्यासाठी आपण युट्युब वर गीतांजलीताई झेंडे या नावाने सर्च करून त्यांची विविध ठिकाणी झालेली कीर्तने ऐकू शकता पुण्याजवळ असणाऱ्या दिवे तालुका पुरंदर या ठिकाणी स्वतःचा ॐ ज्ञानगीता आश्रम नावाचा आश्रम असून तेथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सुंदर असे मंदिर बांधलेले आहे तेथेच परिसरातील मुलांना वारकरी संप्रदायाचे अध्यात्माचे संस्काराचे धडे दिले जातात मुलांकडून अभंग पाठांतर करून घेणे कीर्तन प्रवचन शिकवणे भजन शिकवणे गायन वादन आदी कलांमध्ये त्यांना निपुण करणे व एक आदर्श व संस्कारित पिढी घडवणे हे महत्त्वाचे कार्य ताईंच्या माध्यमातून दिवे आश्रमामध्ये केले जाते केवळ प्रवचन करताना न करता सामाजिक बांधिलकीतून केली जाणारी ही सेवा विशेष उल्लेखनीय आहे. गितांजलीताईंचा विवाह अपूर्वानंद महाराज कुलकर्णी यांचे समवेत झाला व अध्यात्मिक वाटचालीस एक विशेष पर्वाची सुरुवात झाली. एकमेकाला अनुरुप असणारे अध्यात्मिक व्यक्तिमत्व अध्यात्मिक वाटचालीत विशेष बहर आणते .. आदरणीय सौ. गितांजलीताई व आदरणीय अपूर्वानंद महाराज एक आदर्श अध्यात्मिक पती पत्नी म्हणून जगत आहेत