तीर्थ यात्रा पॅकेजेस

Rs. 27000 15 Days

अपूर्व नर्मदा परिक्रमा

मुख्य आकर्षण: ओंकारेश्वर, नर्मदा स्नान, प्रकाशा, केदारेश्वर दर्शन, तापी स्नान, निळकंठेश्वर दर्शन, मांडवगड, उज्जैन, नेमावर, जबलपूर, अमरकंटक, हंडिया, ओंकारेश्वर, पुणे


प्रस्थान तारीख: 14-Dec-2022


प्रस्थान ठिकाण: पुणे


बुकिंग किंमत: Rs. 5000


पहिल्या ५० जणांना प्रत्येकी २०००/- रु. ची सूट

Rs. 27000 15 Days

अपूर्व नर्मदा परिक्रमा

मुख्य आकर्षण: ओंकारेश्वर, नर्मदा स्नान, प्रकाशा, केदारेश्वर दर्शन, तापी स्नान, निळकंठेश्वर दर्शन, मांडवगड, उज्जैन, नेमावर, जबलपूर, अमरकंटक, हंडिया, ओंकारेश्वर, पुणे


प्रस्थान तारीख: 14-Dec-2022


प्रस्थान ठिकाण: पुणे


बुकिंग किंमत: Rs. 5000


पहिल्या ५० जणांना प्रत्येकी २०००/- रु. ची सूट

Rs. 27000 15 Days

अपूर्व नर्मदा परिक्रमा

मुख्य आकर्षण: ओंकारेश्वर, नर्मदा स्नान, प्रकाशा, केदारेश्वर दर्शन, तापी स्नान, निळकंठेश्वर दर्शन, मांडवगड, उज्जैन, नेमावर, जबलपूर, अमरकंटक, हंडिया, ओंकारेश्वर, पुणे


प्रस्थान तारीख: 14-Dec-2022


प्रस्थान ठिकाण: पुणे


बुकिंग किंमत: Rs. 5000


पहिल्या ५० जणांना प्रत्येकी २०००/- रु. ची सूट

अपूर्व यात्रा विषयी


आपले हातपाय धडधाकट आहेत कुठलाही शारीरिक त्रास नाही ,तोपर्यंतच आपण यात्रा कराव्यात व यात्रेचा आनंद घ्यावा व्यवहारिक जीवनामध्ये थोडासा बदल म्हणून व ऊर्जा मिळवण्याचा साधन म्हणून यात्रा केल्या जातात ,तर अध्यात्मिक क्षेत्रामध्ये भगवंताने धारण केलेल्या अवतार व भगवंताच्या प्राप्ती करता ज्यांनी जीवन समर्पित केलं असे असणारे संत महात्मे यांच्या जन्मभूमीमध्ये लीला भूमीमध्ये जाऊन त्या कार्याचे दर्शन घेण्याची संधी दर्शन घेण्याचा योग म्हणजेच तीर्थयात्रा करणे होय ,कालानुरूप तीर्थयात्रेमध्ये बदल होत गेले पूर्वी पायी केली जाणारी तीर्थयात्रा आता विविध साधने वापरून केले जाते, यामध्ये वेळेची व श्रमाची बचत तर होतेच शिवाय सुखदायी प्रवास होतो व आनंद मिळतो याच हेतूने केवळ फिरणं नव्हे तर आनंददायी यात्रा व्हावी हा हेतू मनामध्ये ठेवून अपूर्वयात्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीची स्थापना करण्यात आली.


आणखी बघा
About Us (Home Page)

यात्रेतील दर्शनीये स्थळे


'अमरकंटक मंदिर'
View Details
'भेडाघाट धुंवाधार धबधबा'
View Details
'नेमावर नर्मदा मैयाचे नाभिस्थान'
View Details
'भगवान महाकालेश्वर उज्जैन'
View Details
'श्री क्षेत्र महेश्वर'
View Details
'मांडवगड ( मांडूगड )'
View Details
'श्री क्षेत्र गरुडेश्वर गुजरात'
View Details
'श्री कुबेर भंडारीचे मंदिर'

श्री कुबेर भंडारीचे मंदिर माता रेवा नदीच्या पवित्र तीरावर आहे. बडोद्याच्या कर्नाली(बडोदा/वडोदरा) मध्ये महादेव कुबेर भंडारीच्या नावाने विराजमान आहेत. मंदिराच्या संपूर्ण घुमटावर काचेचे नक्षीकाम आहे. वेगवेगळ्या रंगांच्या ग्लास पेंटिंगचा वापर करून परमेश्वराची रूपे साकारण्यात आली आहेत. मंदिरात देवाच्या सर्व प्रतिमा कोरलेल्या आहेत. भिंतीवरील कलाकृती मंदिराचा इतिहास सांगतात.

कुबेर भंडारी मंदिराचा इतिहास:-
श्री कुबेर भंडारी यांच्याशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत, ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा भगवान कुबेर हे ब्रह्माजींचे पणतू होते, ते मोठे झाल्यावर त्यांचे आजोबा पुलत्स्य यांनी सिंहासनासहित संपूर्ण राज्य पणतू कुबेराकडे सोपवले. रावणाला हे आवडले नाही आणि त्याने शाही ग्रंथ मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. रावणाच्या तपश्चर्येने देवाधिदेव महादेव प्रसन्न झाले आणि वरदान दिले. भोलेनाथाच्या वरदानाने रावणाने श्री कुबेरांचा पराभव केला आणि कुबेर भंडारीकडून सर्व संपत्ती हिसकावून घेतली. अशा स्थितीत नारद मुनींनी श्री कुबेर भंडारी यांना कर्नाली येथे जाऊन तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला.

कुबेर भंडारी, स्वर्गातील एकूण संपत्तीचे खजिनदार:
त्यानंतर घोर तपश्चर्या करून श्री कुबेरांनी महादेवाला प्रसन्न केले. आणि कुबेर भंडारीला स्वर्गातील सर्व संपत्तीचे खजिनदार बनवले. श्री कुबेर भंडारी यांची राज कारभारी रुपात पूजा करण्यात आली. अहंकारी रावण पुष्पक विमान घेऊन कुबेर भंडारींच्या मागे गेला. अशा स्थितीत श्री कुबेरांनी विघ्नेश्वरी माता अंबाची पूजा करून तिचे रक्षण केले. त्यामुळेच आजही कुबेर भंडारी मंदिरात माता अंबेच्या मूर्तीला वेगळे स्थान देण्यात आले आहे. कुबेर मंदिराचे वैशिष्टय़ किंवा महत्त्व म्हटले तरी चालेल पण मंदिराच्या आवारात प्रवेश करताच परम शांतीचा अनुभव येतो. महादेवाच्या वरदानाने श्री कुबेरभंडारी यांची आज जगभरात पूजा केली जाते.

अशी भक्तांची श्रद्धा आहे की, पाच अमावस्येपर्यंत मंदिरात सतत दर्शन घेतल्याने भगवान भोलेनाथ आणि कुबेर भंडारीच्या रूपाने माता जगदंबेच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. शतकानुशतके चालत आलेली एक प्रथा आजही प्रचलित आहे, जसे की मंदिराची पूजा, नवीन कार्याचे उद्घाटन किंवा इतर शुभ कार्यासाठी श्री कुबेर भंडारी यांचे नाव मंत्रपुष्पांजलीच्या शेवटी घेतले जाते. सर्व मंदिरात एक दिव्य शिवलिंग देखील स्थापित केले आहे.कुबेर भंडारी सोबत शिवलिंगाची देखील पूजा केली जाते. जेव्हा कुबेर भंडारी अलंकार आणि अलंकारांनी सजलेले असतात. मंत्रमुग्ध करणारी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या आवारात पिंपळाचे झाड आहे, त्या झाडाला प्रदक्षिणा घालावी.

संकुलाच्या घुमटातील विशाल झुंबराच्या प्रकाशाने मंदिर उजळून निघते. मंदिरातून सुपारी, नाणी, तांदूळ यांचा नैवेद्य जे भक्त घरी घेऊन जातात, त्यांच्या घरी कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आजही कुबेराचे भांडार सदैव भक्तांनी भरलेले असते जे 5 अमावास्येला खऱ्या भक्तीभावाने दर्शनासाठी येतात.

मंदिराच्या आवारात नागेश्वर महादेव, रणछोड रायजी, संकटमोचन हनुमानजी यांचेही दर्शन भाविकांना मिळते. यज्ञासाठी मंदिरात यज्ञकुंड बांधण्यात आला आहे, कुबेरेश्वर भंडारी यांच्या आश्रयाने येणाऱ्या साठी मंदिरातर्फे भंडारा आयोजित केला जातो.

रेवा नदीच्या काठावर अनेक पौराणिक मंदिरे आहेत. अनेक इतिहास आणि पौराणिक कथा सर्व मंदिरांशी निगडीत आहेत. येथे येणारा प्रत्येक भक्त रिकाम्या हाताने परतत नाही, श्री कुबेर भंडारी निस्वार्थी अंतःकरणाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

View Details
'श्री क्षेत्र नारेश्र्वर'

श्रीरंग अवधूत स्वामी महाराज समाधी मंदिर

श्री रंग अवधूत स्वामी महाराजांचे परम पावन वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी आहे. या जागेची पार्श्वभूमी मोठी अद्भूत आहे. श्रीरंग अवधूत स्वामी महाराज उपासनेसाठी हिमालयाच्या कुशीत जात असताना ‘मागे फिर, मागे फिर’ असे शब्द ऐकू आले. गुरूआज्ञाच समजून ते परतले. नर्मदा किनारी एकाने जागा सुचवली. त्यांचेबरोबर २-३ व्यक्ती होत्या. त्यांना सांगितले, आपण घरी जा मी येथेच मुक्काम करतो. उद्या आपण या मी आपणांस सांगेन. ते स्वामी तेथेच मुक्कामास राहिले ती जागा ८-१० गावांची स्मशानभूमी होती. पिशाच्चांचे वास्तव्य असलेली मोठमोठी झाडे होती की सूर्यप्रकाशही भूमीवर पडत नसे. सहसा दिवसा सुद्धा येथे कोणी येण्यास धजत नसे. हिंस्त्र प्राणी, विंचू, इंगळ्या, मोर, सर्प इ. राजरोसपणे फिरत असत. त्या बाजूस रात्री शंख फूंकण्याचे, डमरूचे आवाज ऐकले. साप-मुंगुस, मोर-साप यांच्यासारखी जन्म शत्रू प्राणी येथे प्रेमाने एकत्र असल्याचे बापजींनी पाहिले. स्वामींनी निर्णय घेतला की येथेच तपाचरण करायचे. तेच हे श्री रंग अवधूत स्वामींचे नारेश्र्वर! नर्मदा किनारीचे पवित्र तीर्थक्षेत्र होय.

याठिकाणी श्री रंग अवधूत स्वामींचा अवधूत निवास हा आश्रम आहे. प्रार्थना भवन, मातृकुटीर बोधी वृक्षासारखा लिंबाचा वृक्ष इ. स्थाने दर्शनीय आहेत. हा मंदीर परिसर अत्यंत स्वच्छ, देखणा व पवित्र व प्रसन्न आहे. या परिसरात भक्तनिवास, भोजनालय इ. सुविधा आहेत. याठिकाणी श्रीरंगजयंती, दत्तजयंती इ. अनेक उत्सव साजरे केले जातात. अनेक धनाढ्य लोकांचा श्री रंग अवधूत स्वामींवरील असणाऱ्या श्रद्धेने याठिकाणी अनेक भक्त देणग्या देतात. त्यातून भक्तांसाठी अनेक सोई सुविधा निर्माण केल्या आहेत. भारतातूनच नव्हे तर जगातील अनेक देशांतील भक्त येथे येऊन सेवा करतात. संस्थान सातत्याने धार्मिक बरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवते.

येथे भक्तनिवास निःशुल्क, नाममात्र शुल्काने उपलब्ध आहे. भक्तांसाठी भोजन प्रासाद येथे मोफत उपलब्ध आहे. स्मशानाच्या घेतलेल्या जागी स्वामी महाराजांनी स्वर्ग निर्माण केला आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. येथे गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, श्रीरंग अवधूत स्वामी महाराजांचा स्मृतीदिन, असे उत्सव साजरे होतात. श्रीक्षेत्र नारेश्वर विशेष बडोद्यापासून ६० कि. मी. अंतरावर श्रीक्षेत्र नारेश्वर हे गुजरात राज्यातील एक महान दत्तक्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद ्ध आहे. दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्रीरंगावधूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले हे ठिकाण आहे. तेथेच त्यांची समाधी आहे. गुजरात राज्यात त्यांनी श्रीदत्त संप्रदायाचा फार मोठय़ा प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला आहे. नारेश्वराचे माहात्म्य फार प्राचीन आहे. फार वर्षांपूर्वी येथे कपर्दीश्वराचे मंदिर होते. नर्मदेच्या पुरामुळे ते मंदिर पडले व पिंड खाली जमिनीत गेली. असे मानले जाते की नारोशंकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एकदा शंकराने येऊन सांगितले की, मी जमिनीत गाडला गेलो आहे. मला बाहेर काढून जीर्णोद्धार कर. त्याप्रमाणे नारो शंकरांनी ती पिंड बाहेर काढून त्याची प्रतिष्ठापना केली. म्हणून नारेश्वर असे नाव पडले. येथे गणपतीने उग्र तपश्चर्या केली होती अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेथे भयाण अरण्य होते. हिंस्र श्वापदांची तेथे वस्ती होती. दहा गावची ती स्मशानभूमी होती. दिवसासुद्धा तेथे कोणी येण्यास धजत नव्हता. एकांतस्थान असल्याने व वर्दळ नसल्याने अवधूतांनी ही जागा उपासनेसाठी पसंत केली. रात्री त्यांना शंखाचे आवाज-भजनाचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. शिवाय तेथे मुंगूस व मोर एकत्र खेळताना आढळले. वरील कारणांमुळे अवधूतांनी उपासनेसाठी ही जागा पसंत केली असावी अशी श्रद्धा आहे. नर्मदाकाठ, गणेशाचे उपासनेसाठी वास्तव्य यामुळे पवित्र असे हे तीर्थक्षेत्र होतेच. त्यात पुन्हा अवधूतांच्या वास्तव्यामुळे ते तीर्थ जागृत असे तीर्थक्षेत्र झाले. नारेश्वर येथे एका कडुलिंबाच्या झाडाखाली अवधूतांनी खडतर तपश्चर्या केली. तो कडुलिंब नम्र होऊन त्याच्या फांद्यांची वाढ वर (उर्ध्व) न होता खाली जमिनीकडे झाली. त्या फांद्या जमिनीस टेकल्या आहेत, असे मानले जाते. इतकेच नव्हे तर अवधूतांच्या तपश्चर्येमुळे त्या कडुलिंबाची पाने गोड झाली आहेत, असे संगितले जाते. रंगावधूत महाराजांचे पूर्वीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असे होते. त्यांचे वडील नोकरीनिमित्त गुजरातमध्ये गोधरा या ठिकाणी राहात होते. महाराजांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. एकदा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा वाडी येथे मुक्काम होता.

थोरले महाराज कृष्णेवर स्नान करून रस्त्याने जात असताना समोर बाळ पांडुरंग उभा होता. बाळाने त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. स्वामी म्हणाले, ‘‘बाळ तू कुणाचा?’’ बाळ म्हणाला, ‘‘तुमचाच.’’ स्वामींनी त्याला एक खडीसाखरेचा खडा प्रसाद म्हणून दिला. तो बाळाने खाल्ला. हीच गुरू-शिष्यांची पहिली व शेवटची भेट. पुढे लौकिकदृष्टय़ा पांडुरंगाची व स्वामींची भेट झाली नाही. ही भेट शेवटची ठरली. या भेटीत स्वामींनी बाळावर पूर्ण कृपा केली. प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे समाधी स्थळ गरुडेश्वरापासून नारेश्वर जवळच आहे.

रंगावधूत महाराज नारेश्वर येथे अखेपर्यंत आपल्या आईसोबत राहिले. त्यांनी गुरुचरित्राच्या ५२ श्लोकांवर आधारित अशी रचलेली दत्तबावनी अतिशय प्रसिद्ध आहे. दत्तबावनीवर अनेक भक्तांची श्रद्धा आहे. त्यांनी अनेक स्तोत्रे रचली असून सत्य दत्त पूजा व्रताचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आहे.प.पू. रंगावधूत महाराजांना बापजी असेही म्हणत असत. नारेश्वर येथे मोठे मंदिर असून बापजींची समाधी, अवधूत मंदिर, अवधूत गुंफा, प्रार्थना मंदिर, बोधीवृक्ष-निंब, बापजींच्या पादुका आणि मातृमंदिर असा परिसर आहे. येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे.

येथील नर्मदा किनारा अतिशय सुंदर आहे.

View Details
'मिठीतलाई'

विमलेश्वर वरून नावेत बसल्यानंतर सुमारे चार तासानंतर आपण उत्तर तटावर समुद्राच्या किनारी पोहोचतो या प्रवासामध्ये आपल्याला अनेक समुद्र पक्षी दिसतात त्यांना खाण्याकरता फुटाणे चिवडा किंवा बिस्किटे जरूर घ्यावीत पडी पलीकडे गेल्यानंतर नावेतून उतरण्याकरता तेथे जेट्टी बांधलेली आहे वर चढून आपण आपल्या बस कडे जावे तिथून जवळच मिठीतलाई नावाचे एक सुंदर असे ठिकाण आहे समुद्रकिनाऱ्यावरती असणारी गोड्या पाण्याची एकमेव विहीर या ठिकाणी असल्यामुळे त्याला मिठीतलाई असे म्हटले जाते या ठिकाणी नर्मदा मयाचे सुंदर असे मंदिर व पायी परिक्रमावासींना थांबण्यासाठी धर्मशाळा आहे या ठिकाणी असणाऱ्या गोड्या विहिरीचे पाणी भरपूर उथळ असल्यामुळे या ठिकाणी सर्वच परिक्रमावासी बादलीने पाणी शेंदून पाणी वर काढून स्नान करतात या ठिकाणी स्नान पूजा व जेवण करून मग पुढे जाता येते.

View Details
'वमलेश्वर अथवा विमलेश्वर'

वमलेश्वर अथवा विमलेश्वर नर्मदा मैया च्या परिक्रमामध्ये ज्या ठिकाणी नर्मदा मैया समुद्राला मिळते ते ठिकाण अर्थात रेवासागर समुद्रा मधून नर्मदा माईचे पात्र पार करण्याकरता या ठिकाणावरून नावा सोडतात नर्मदा माईच्या परिक्रमामध्ये नर्मदेचा प्रवाह कोठेही ओलांडता येत नाही ज्या ठिकाणी मैया समुद्राला मिळते त्या समुद्रा मधून आपल्याला पलीकडे जावे लागते वमलेश्वर नावाचे हे ठिकाण असून येथून नावा सुटतात.

समुद्राच्या भरती ओहोटीच्या वेळेनुसार या ठिकाणी नावा सुटतात ज्या दिवशी जी तिथी असेल त्या तिथीनुसार भरतीची वेळ ठरावीक असते त्यामुळे अगदी पहाटे दोन वाजल्यापासून या नावांची सुटण्याची वेळ असते तिथीनुसार या वेळेमध्ये रोज थोडा थोडा बदल होत जातो हा नावेचा प्रवास साधारण चार तासांचा असून एकाच वेळी अनेक नावा सुटतात एका नावे मध्ये 40 ते 60 परिक्रमावासी बसलेले असतात पलीकडे जाऊन मिठीतलाई या ठिकाणी नावा थांबतात. हा समुद्र प्रवास चार तासांचा असल्यामुळे ज्यांना आवश्यकता वाटत असेल त्यांनी स्वतः सोबत नाश्त्याचे पदार्थ व पाण्याची बाटली आवर्जून घ्यावी जर नाव सकाळी सुटत असेल तर उन्हापासून संरक्षणा करता डोक्यावर पांढरे वस्त्र घ्यावे थंडीचे दिवस असतील व मध्यरात्री नाव सुटणार असेल तर स्वेटर मफलार वगैरे सोबत असू द्यावे.

येथे नर्मदा मैयाची ओटी भरून पूजा केली जाते आपल्या सोबत असणाऱ्या नर्मदा मैयाचे जलाची बाटली आपल्या सोबत घ्यावी व पूजा साहित्य आपल्या सोबत असू द्यावे येथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी मैया समुद्राला मिळते त्या ठिकाणी मयाची ओटी भरून नारळ अर्पण करावयाचा असतो व यथाशक्ती दक्षिणा नावाड्यांना दिली जाते. नावेचे बुकिंग आदल्या दिवशी केले जाते जास्त गर्दी असेल तर या ठिकाणी एक दोन दिवस ही थांबावे लागते पाईपरीक्रमावासी व बसचे परिक्रमावासी यांना नावेचे तिकीट वेगवेगळे असून ते आपण स्वतः द्यावयाचे असते.

विमलेश्वर या ठिकाणी भगवान विमलेश्वराचे सुंदर असे मंदिर असून सुंदर असे शिवलिंग त्यामध्ये विराजमान आहे बाजूलाच बारा ज्योतिर्लिंगाचे स्थापना केलेली असून हा संपूर्ण परिसर अतिशय रमणीय असा आहे या ठिकाणी थांबण्याकरता आत्ता एक नवीन धर्मशाळा बनवलेली असली तरी देखील पायी परिक्रमा व श्री मात्र विमलेश्वराच्या जवळ असणाऱ्या धर्मशाळेत अर्थात मोकळ्या मैदानामध्ये थांबतात. हे ठिकाण समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे येथे स्नाना करता पाणी सहज उपलब्ध होत नाही गावामध्ये एक तलाव बांधलेला असून तेथेच स्नानासाठी जावे लागते या ठिकाणी परिक्रमावसींची गैरसोय होते परंतु त्याला पर्याय नसल्यामुळे सर्वजण येथेच थांबतात.

आपले सर्व साहित्य आपल्या बसमध्ये ठेवून आपल्यासोबत फक्त नर्मदा मैयाच्या जलाची बाटली पूजेचे साहित्य पिण्याच्या पाण्याची बाटली व काही खाद्यपदार्थ एवढेच घेऊन नावेत बसायचे असते नावे मध्ये सहसा कोणीही चपला घालून जात नाही आपली चप्पल गाडीमध्येच ठेवावी लागते याची नोंद घ्यावी.

View Details
'बलबला कुंड हासोट'

अंकलेश्वर वरून पुढे गेल्यानंतर साधारण पंचवीस किलोमीटरवर बलबला कुंड नावाचे एक सुंदर असे ठिकाण आहे या ठिकाणी एक कुंडा असून या कुंडामध्ये सतत वायूचे बुडबुडे निघत असतात असे म्हणतात की नर्मदे हर मोठा जयघोष केल्यानंतर या बुडबड्यांचे प्रमाण वाढते या कुंडामध्ये सतत बुडबुडे निघत असल्यामुळे या ठिकाणचे नाव बलबला कुंड असे पडले आहे या ठिकाणी सुंदर असे शिवमंदिर असून परिक्रमावासींना राहण्यासाठी एक छान धर्मशाळा आहे

येथून पुढे वमलेश्वर हे ठिकाण जवळ पडते.

View Details
'श्री क्षेत्र भालोद'

नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावर भालोद येथे अतिशय प्रसन्न अशी एकमुखी दत्तप्रभूंची मूर्ति आहे.

१४०० शतका मधील एकमुखी दत्तात्रेयांची मूर्ती ज्याची विशेषता आहे की अंधारात अथवा प्रकाशातही या मूर्तिच्या पोटावर गोमुख दिसते. नर्मदा परिक्रमेमध्ये श्रीदत्तप्रभूंची मंदिरे अगदी मोजकीच आहेत. जबलपूर, होशंगाबाद, गरुडेश्वर, राजघाट (चिखलदाच्या समोर) आणि भालोद. यातील दक्षिण किनाऱ्यावर राजघाट आणि भालोद हिच दोन दत्तमंदिरे आहेत. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रत्यक्ष हाताने प्रस्थापित झालेले राजघाटचे दत्त मंदिर आहे. जे सध्या डूबक्षेत्रात असल्याने पाण्याखाली आहे. दुसरे मंदिर भालोदचे एकमुखी दत्त मंदिर हे आहे. राजघाट येथिल श्रीदत्तमंदिर हे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे.

स्वामी महाराजांच्या चातुर्मास चिखलदा (म. प्र.) येथे असताना भक्तांच्या आग्रहाखातर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली राजघाटच्या मंदिराचे कार्य झाले आहे.

या मंदिराचा इतिहास अलीकडील आहे. महाराजांच्या स्वप्न दिक्षेनंतर पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन नर्मदा परिक्रमा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोद येथे राहण्यासाठीचा आदेश मिळाला. याच दरम्यान बडोदा येथे काशिताई निरखे यांच्याकडे असलेली पुरातन दत्तमुर्ती भालोद येथे अचानक आली आणि येथे दत्त मंदिर स्थापन झाले. काशिताई निरखे यांच्या आजोबांना रात्री दत्तप्रभूंनी प्रत्यक्ष येऊन मी नर्मदेच्या पाण्यात आहे, मला तू घेऊन जा, असे स्वप्नामध्ये सांगितले. त्याप्रमाणे दत्तप्रभूंची मूर्ती शोधत आली आणि बडोदा येथे त्यांचे मंदिर देखिल बनले. आजोबांनंतर त्यांचा मुलगा आणि मग नातीकडे (काशीकडे) मंदिराचा कारभार आला. त्यांनी ८५ पर्यंत वयाची मजल गाठली. पुढे कार्य होत नव्हते, काय करावे ते कळत नव्हते. पण शेवटी भक्तांची काळजी देवालाच असते ना ! त्यांना रात्री स्वप्न पडले आणि श्रीदत्तप्रभूंनी आदेश दिला कि उद्या नर्मदा किनाऱ्यावरून जो गृहस्थ येईल त्याला तू मला देऊन टाक. अगदी तसेच घडले. पू. प्रतापे महाराज मंदिरात पोहोचले आणि दत्तप्रभू भालोदला आले. नर्मदा किनाऱ्यावरील भालोद येथिल ही मूर्ती एकमुखी आणि शाळीग्रामाची आहे. वक्षस्थळावर गोमुख स्पष्टपणे दिसते ! निरखून बघितल्यावर योगाचे षट्चक्षु पण लक्षात येतात!

मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे, आश्रमा समोर नर्मदा मैयाचे विशाल पात्र, सुंदर स्वच्छ पाणी, मोरांचा आश्रमातला वावर, मनाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही! भालोद या ठिकाणी कन्यापूजन हा विधी केला जातो. तसेच नर्मदामातेची ओटी भरली जाते. येथे नर्मदा परिक्रमावासी भेटतात. त्यांचेसाठी सदावर्त आणि राहण्याची व्यसस्था येथे आहे. याठिकाणी श्रीसत्यदत्तपूजा आणि दत्तयाग हे विधी करता येतात. श्रीगुरूचरित्राच्या पारायणासाठी राहता येते. येथून नर्मदा नदीच्या विशाल पात्रातून होडीने श्रीक्षेत्र नारेश्वराला जाता येते. साधारण एक तासाचा प्रवास आहे. नर्मदेच्या विशाल पात्राचे दर्शन आणि दोन्ही तीरावरील मंदिरे पहात जाण्याचा हा अनुभव विलक्षण आहे. भालोद हे एक विशेष दत्तक्षेत्र आहे.

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा...

View Details
'श्री शनिदेव पनोती मंदिर कुंभेश्वर'

नर्मदा मैयाच्या किनारी कुबेराचे पाच महत्त्वाचे ठिकाण आहेत त्यापैकी पहिले ठिकाण म्हणजे कुंभेश्वर हे होय समोरील किनाऱ्यावर कुबेर भंडारी चे प्रसिद्ध असे प्रणालीचे मंदिर आहे कुंभेश्वर याच ठिकाणी शनि देवांचे सुंदर असे मंदिर असून येथे मोठी पनोती व नाणी बनवती अर्थातच छोटी बनवती अशा शनि देवांच्या दोन पत्नी यांचे मंदिर आहे साडेसाती मध्ये या ठिकाणी अनेक जण येऊन शनि देवांची पूजा करतात व शनी पीडेपासून मुक्ती मिळवतात छोटेसे परंतु अतिशय महत्त्वपूर्ण असे हे ठिकाण नर्मदा मैयाच्या किनारी आहे या ठिकाणी सुमारे एक फूट उंचीचे नर्मदेश्वरात कोरलेले श्रीयंत्र आपणास पहावयास मिळते.

View Details
'कुबेर मंदिर'

स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून अवघ्या 30 किमी अंतरावर असलेल्या नीलकंठधाममध्ये आपल्याला आकर्षित करणारी प्रत्येक गोष्ट आहे. येथे येणारे भाविक मंदिर, प्रदर्शन स्थळ तसेच नर्मदा नदीच्या पलीकडे असलेल्या कुबेर मंदिराला भेट द्यायला विसरत नाहीत.

मंदिर : 50 वर्षांपूर्वी शास्त्रीजी महाराजांनी नर्मदेच्या काठावर हे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. हे भव्य मंदिर स्वामीनारायण गुरुकुल राजकोटने 2013 मध्ये 105 एकर जागेवर बांधले होते. मंदिराची वास्तू, मोठ्या बागा, भव्य शिल्पे सर्वांनाच मोहित करतात. आतापर्यंत 4 कोटीहून अधिक लोक या नवीन धार्मिक स्थळी आले आहेत.

मंदिराभोवती 40 लाख लिटर पाण्याचा नीलकंठ सरोवर आहे. स्वामीनारायण, घनश्यामजी, नीळकंठ वर्णेंद्र भगवान, राधाकृष्ण देव, शिवलिंग, गणेशजी, हनुमानजी, 24 अवतार मंदिरांसह 32 छोटी-मोठी मंदिरे आहेत. मंदिरात 108 गायमुखी गंगेतून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या पाण्यात स्नान करणाऱ्या भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. दर्शनाबरोबरच सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत चालणारा लाईट शो देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

नीलकंठधाममध्ये दररोज देवाच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो. यामध्ये 108 लिटर गाईचे दूध, 108 औषधी कलश, शेतातील माती, प्रोटोना रस, अबीर, गुलाल यांचा अभिषेक केला जातो. अभिषेकाच्या १ तासानंतर शृंगार आरती होते.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक लाख प्रकारचे भोग ठाकुरजींना अर्पण केले जातात. उत्कृष्ट सेवा आहे, दररोज सायंकाळी 5.30 वाजता मिरवणूक असते. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अभिषेक झाल्यानंतर गायीचे दूध नंतर आदिवासी मुलांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जाते.

रथयात्रा : मंदिर परिसरात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता निघणाऱ्या रथयात्रेने वातावरण भक्तिमय बनते. तोफगोळे, घोडे, गायी, हत्ती, तसेच रथ ओढताना स्त्रिया आणि पुरुष पाहून सर्वजण भगवान स्वामीनारायणाच्या भक्तीत तल्लीन होतात. मंदिरासमोर रथयात्रा संपते आणि नंतर भव्य आरती होते. त्याचवेळी प्रकाशात मंदिराची सावली आणखीनच मनमोहक होते. आरतीच्या वेळी भक्तांनी परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी केलेले प्रयत्न प्रत्येकाच्या मनात पूज्यभाव जागृत करतात.

सहजानंद ब्रह्मांड: नीलकंठधाममधील सहजानंद ब्रह्मांड देखील लोकांसाठी आकर्षणाचे एक मोठे केंद्र आहे. नैसर्गिक वातावरणात बनवलेल्या या केंद्रात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत भरपूर मनोरंजन आहे. हिरवाईच्या मधोमध देवाची झलक सर्वांनाच भुरळ घालते. लाइट अँड साऊंड शो, मल्टीमीडिया व्यसनमुक्ती शो, यमपुरीचा बोगदा, मिरर हाऊस, थ्रीडी फिल्म, बोटिंग, बर्ड हाऊस आणि एन्जॉय पार्क इत्यादी पर्यटकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

नीलकंठधामचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे फोटो आणि व्हिडीओ काढण्यावर कोणतेही बंधन नाही. मंदिर आणि प्रदर्शनाच्या ठिकाणी लोक जोरदार फोटोग्राफी करतात आणि इथेही ते सोनेरी आठवणी कॅमेऱ्यात टिपून सोबत घेऊन जाऊ शकतात.

View Details
'शूलपाणेश्वर मंदिर गोरागाव'

प्राचीन शूलपाणेश्वर मंदिर मणीबेली गावाजवळ (महाराष्ट्र) नर्मदा आणि देव गंगा नदीच्या संगमावर सरदार सरोवर धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. सध्या प्राचीन शूलपाणेश्वराचे मंदिर सरदार सरोवराच्या पाण्यात बुडलेले आहे.

हे मंदिर पौराणिक मान्यतेवर आधारित आहे की ते स्वतः भगवान शिव यांनी स्थापित केले होते आणि त्यात स्वयंभू लिंग देखील आहे. त्यामुळे हे मंदिर नर्मदा नदीच्या काठावरील पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. शूलपाणि हे मैयाचे ह्रदय मानले जाते.

अग्नी महापुराण, स्कंद महापुराण, वायुपुराण आणि इतर पुराण यांसारख्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये, मंदिराला नर्मदा नदीच्या काठावरील पवित्र मंदिरांपैकी एक मानले जाते. हे भृगु पर्वत म्हणून ओळखल्या जाणार्‍या पवित्र टेकडीच्या अगदी जवळ होते आणि घनदाट जंगलांच्या तसेच शूलपाणेश्वर धबधब्याच्या विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध होते. स्कंद पुराणानुसार हे देवस्थान परशु सारखे म्हणजेच कुऱ्हाडीसारखे आहे, जे पापांचा नाश करते.

भगवान शिवाने त्रिशूलाने अंधकासुर राक्षसाचा नाश केला. या त्रिशूळावर रक्ताचे डाग होते, ते काढता येत नव्हते, अरण्यात फिरत असताना भगवान शिव वरील ठिकाणी आले आणि तेथे त्रिशूळ जमिनीवर आदळल्यानंतर पाण्याचा प्रवाह बाहेर आला. या पाण्याने त्रिशूलावरील रक्ताचे डाग दूर झाले. अशा प्रकारे भगवान शंकराच्या त्रिशूळावरील रक्ताचे डाग दूर झाले. भगवान शंकराचे शूल (वेदना) पाण्याने काढून टाकले होते, त्यामुळे येथील मंदिराला शूलपाणेश्वर म्हणून ओळखले जाते.

सरदार सरोवर धरणाच्या बांधकामामुळे हे मंदिर 1991 मध्ये तलावात बुडाले होते, परंतु नवीन शूलपाणेश्वर मंदिराची जागा गुजरात सरकारने गोरा पुलाजवळ डाव्या तीरावर असलेल्या 160 फूट उंच टेकडीवर निश्चित केली होती आणि 07. /05/1994 दररोज नवीन शूलपाणेश्वर मंदिर प्रतिष्ठा शास्त्र संस्काराने पावन होते. त्या काळातील शंकराचार्य व धर्माचार्य यांच्याशी सल्लामसलत करून या ठिकाणाची व मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली.

दरवर्षी चैत्र वद तेरस, चौदस या दिवशी या ठिकाणी स्थानिक लोकांची व डोंगरी लोकांची आणि महाराष्ट्रातील वनवासी यांची जत्रा भरते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक शूलपाणेश्वर मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेतात. शूलपाणेश्वर मंदिर हे खऱ्या अर्थाने श्रद्धा आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहे.

येथे सुंदर घाट बनवलेला आहे.

View Details
'श्री क्षेत्र प्रकाशा'

अपूर्व यात्रा नर्मदा परिक्रमेत आपण श्री क्षेत्र प्रकाशा येथे जातो.

आयुष्यात एकदा तरी काशी दर्शनाचा लाभ घ्यावा हीच प्रत्येक हिंदूची इच्छा आहे आणि जिवंतपणी हे शक्य नसेल तर किमान मृत्यूनंतर अस्थिकलश काशीला नेऊन गंगेसारख्या पवित्र नदीत विसर्जित करावे. . पण एक तीर्थक्षेत्र देखील आहे जिथे जाणे काशी यात्रेइतकेच पुण्यदायी आहे. ज्या स्थानाला दक्षिणकाशी म्हटले जाते.

हे मंदिर मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमेवर नंदुरबार जिल्ह्यात आहे. प्रकाशा, ताप्ती, पुलंदा आणि गोमाई या नद्यांच्या संगमावर शिवाची 108 मंदिरे असल्यामुळे याला 'प्रतिकाशी' असेही म्हणतात.

काशीप्रमाणेच पुण्यवान समजल्या जाणाऱ्या या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून दररोज शेकडो भाविक येतात. 'ताप्ती महात्म्य' या प्राचीन शास्त्रानुसार अनेक शतकांपूर्वी सहा महिन्यांचे दिवस आणि रात्र असायची. या काळात भगवान शिव स्वतः एका परिपूर्ण पुरुषाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की जिथे एकाच रात्रीत माझी 108 मंदिरे बांधली जातील, तिथे मी कायमचा निवास करीन. त्यानंतर सूर्यकन्या ताप्ती, पुलंदा आणि गोमाई नद्यांच्या संगमावरील हे सुंदर ठिकाण मंदिराच्या बांधकामासाठी निवडण्यात आले.

शिवभक्तांनी या ठिकाणी एका रात्रीत म्हणजेच सहा महिन्यात 107 मंदिरे बांधली आणि 108 व्या मंदिराचे बांधकाम सुरू असताना सकाळ झाली. या जागेवर पडणाऱ्या प्रकाशामुळे ते ‘प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध झाले. यानंतर तीर्थक्षेत्र काशीमध्ये भगवान शंकराची 108 मंदिरे बांधण्यात आली आणि तेथे भगवान काशी स्वतः विश्वेश्वराच्या रूपात विराजमान झाले.

ताप्ती नदीच्या काठावर वसलेली ही सर्व मंदिरे हेमाडपंथी रूपात दगडात बनलेली आहेत. याच मंदिरात काशी विश्वेश्वर आणि केदारेश्वराचे मंदिर आहे. काशीच्या तीर्थक्षेत्रातही या मंदिराची स्थापना झालेली नसल्यामुळे येथे असलेल्या पुष्पदंतेश्वर मंदिरालाही खूप महत्त्व आहे. काशीला गेल्यावर इथे येऊन उत्तरपूजा केली नाही तर काशीयात्रेचा पुण्य लाभ मिळत नाही, असे म्हणतात.

मंदिराच्या गर्भगृहात काळ्या पाषाणात कोरलेले भव्य शिवलिंग व नंदी आहे. केदारेश्वर मंदिरासमोर दगडाने बनवलेले भव्य दीपगृह आहे. या ठिकाणी अंत्यसंस्कार व अस्थी विसर्जनाचे तीर्थक्षेत्र काशीसारखेच आहे. त्यामुळे देश-विदेशातून अनेक लोक आपल्या कुटुंबीयांच्या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी येथे येतात. एकदा प्रकाशाची यात्रा करणे म्हणजे शंभर वेळा काशीची यात्रा करणे असे भक्त मानतात.

मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर स्थित, प्रकाशा हे नंदुरबारपासून 40 किमी अंतरावर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर वसलेले आहे. नाशिक, मुंबई, पुणे, सुरत आणि इंदूर येथून नंदुरबारपर्यंत बससेवा उपलब्ध आहे.

रेल्वेने: नंदुरबार हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे जे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर आहे.

View Details
'109 वर्षीय सियाराम बाबा'

109 वर्षीय सियाराम बाबा: ज्यांनी 12 वर्षे उभे राहून तपश्चर्या केली आणि 12 वर्षे मौन बाळगले.
सियाराम बाबा : इतिहास साक्षी आहे की भारतीय संतांनी योग आणि ध्यानाच्या बळावर संपूर्ण जगाला चमत्कार दाखवले आहेत. यासोबतच कठोर अभ्यासातून इंद्रियांवर संयम ठेवणे आणि प्रत्येक ऋतूत शरीराला अनुकूल बनवणे यामुळेही सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळेच योग आणि अध्यात्माच्या बाबतीत भारताचा क्रमांक अव्वल आहे. त्यामुळे, योगाचे बारकावे जाणून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक भारतात येत असतात.

मध्य प्रदेशातील एका अशा संत आहेत ज्यांची झलक पाहण्यासाठी केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भक्त ते सियाराम बाबा म्हणून ओळखले जातात. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील नर्मदेच्या तीरावर असलेल्या भट्याण मध्ये त्यांचे वास्तव्य आहे. बाबांचे वय 109 वर्षे असल्याचे सांगितले जाते.

बाबा हे भगवान हनुमानाचे परम भक्त आहेत आणि ते राम चरित्रमानसचे सतत पाठ करताना आढळतात. असे मानले जाते की सियाराम बाबा यांचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे झाला आणि त्यांनी 7-8 वी पर्यंत शिक्षणही घेतले आहे.त्याच वेळी, एका साधूच्या संपर्कात आल्यानंतर, अलिप्तता आत्मसात करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली आणि ते घर सोडून हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी गेले. तथापि, त्याचे नंतरचे जीवन बरेच रहस्यमय आहे आणि कोणाला त्याबद्दल माहिती नाही.

सियाराम बाबांची एक खास गोष्ट म्हणजे ते फक्त 10 रुपये दान घेतात. जर कोणी त्यांना 10 रुपयांपेक्षा जास्त देणगी दिली तर ते उर्वरित पैसे त्यांना परत करतात. असे म्हणतात की एकदा अर्जेंटिना आणि ऑस्ट्रियातील काही लोक बाबांच्या आश्रमात दर्शनासाठी गेले आणि त्यांनी बाबांना 500 रुपये दिले, परंतु बाबांनी 10 रुपये घेऊन उर्वरित पैसे परत केले.

सियाराम बाबांचा समाजकार्यातही मोलाचा सहभाग आहे. बाबांनी नर्मदा घाटाच्या दुरुस्तीसाठी आणि पाऊस लागू नये म्हणून शेड बांधण्यासाठी 2 कोटी 57 लाख रुपये दान केले. त्याच वेळी, सियाराम बाबा यांनी बांधकाम सुरू असलेल्या मंदिराच्या शिखराच्या बांधकामासाठी 5 लाख रुपये दान केले होते.

थंडी असो वा ऊन असो, सियाराम बाबा नेहमी लंगोटातच दिसतील. ध्यानाच्या बळावर त्यांनी आपले शरीर हवामानाला अनुकूल असे बनवले आहे, त्यामुळे कडाक्याची थंडीही त्यांच्या शरीराला इजा करत नाही. इतके वृद्ध असूनही, ते त्यांची सर्व कामे स्वतः करतात.

पायी परिक्रमावासींना ते दाल चावल व भेळ चिवडा देतात. आरतीचे साहित्य देतात. इथे सर्व भाविकांना चहाचा प्रसाद मिळतो.

यांचे दर्शन घेऊन आपण कृतार्थ होऊयात.

View Details
'ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश'

ओंकारेश्वर मंदिर मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीजवळ शिवपुरी आणि मांधाता बेटावर आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर येथे स्थापित आहे. या ठिकाणी नर्मदा नदी 'ओम'च्या आकारात वाहते, असे म्हणतात. तसेच ओंकारेश्वराला यात्रेकरू सर्व तीर्थांचे जल अर्पण करेपर्यंत तीर्थयात्रा पूर्ण मानली जात नाही,

ऐतिहासिक माहिती - आतापर्यंत मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यांनुसार, या मंदिराच्या बांधकामासाठी 1063 मध्ये राजा उदयादित्यने चार दगड बसवले होते, ज्यावर संस्कृत भाषेत स्तोत्र कोरलेले होते. यानंतर 1195 मध्ये राजा भरतसिंह चौहान यांनी ही जागेवर मंदिर बांधले. यानंतर मांधातावर सिंधी, माळवा, परमार यांचे राज्य होते. १८२४ मध्ये हा परिसर ब्रिटिश सरकारच्या ताब्यात देण्यात आला.

ओंकारेश्वर मंदिराशी संबंधित तीन कथा आहेत, त्यापैकी एका कथेनुसार नारदजी एकदा विंध्याचल पर्वतावर पोहोचले होते. विंध्याचल, ज्याला पर्वतराज म्हणतात, तेथे पोहोचल्यावर विंध्याचलाने नारदजींचा आदर केला. यानंतर विंध्याचल पर्वतराज म्हणाले की मी सर्व गुणांनी परिपूर्ण आहे, सर्व काही माझ्यावर आहे. नारदजी पर्वतराजांचे बोलणे ऐकत राहिले आणि शांत उभे राहिले. जेव्हा पर्वतराजांची चर्चा संपली तेव्हा नारदजींनी त्यांना सांगितले की मला माहित आहे की तू सर्व गुणांनी परिपूर्ण आहेस, परंतु तरीही तू सुमेरू पर्वतासारखा उंच नाहीस. सुमेरू पर्वत पहा, ज्याची शिखरे स्वर्गापर्यंत पोहचलेले आहेत.

या गोष्टी ऐकून विंध्याचल स्वतःला उच्च सिद्ध करण्यासाठी विचार करू लागले. नारदजींचे हे बोलणे ऐकून विंध्याचलाला खूप अस्वस्थ वाटले कारण इथे त्यांच्या अहंकाराचा पराभव झाला. स्वतःला सर्वोच्च बनवण्याच्या इच्छेने त्यांनी भगवान शिवाची उपासना करण्याचे ठरवले. सुमारे ६ महिने कठोर तपश्चर्या करून त्यांनी भगवान शंकराला प्रसन्न केले. अखेरीस भगवान शिव विंध्याचलवर प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रकट होऊन वरदान माग असे सांगितले.

यावर विंध्याचल म्हणाले की हे परमेश्वर ! मला बुद्धी देवून मी जे काही काम हाती घेतो ते पूर्ण होवो. त्यामुळे विंध्याचल पर्वताला वरदान मिळाले. भगवान शंकरांना पाहून जवळचे ऋषी तेथे आले आणि त्यांनी भगवान शंकरांना येथे निवास करण्याची प्रार्थना केली. अशा प्रकारे भगवान शिवांनी सर्वांचे पालन केले, तेथे स्थापित लिंग दोन लिंगांमध्ये विभागले गेले. यातून विंध्याचलने स्थापन केलेल्या पार्थिव लिंगाला अमलेश्वर लिंग असे नाव देण्यात आले, तर ज्या ठिकाणी भगवान शिव वास करतात असे मानले जाते ते ओंकारेश्वर शिवलिंग म्हणून ओळखले जाऊ लागले.

ओंकारेश्वर लिंगाशी संबंधित आणखी एक कथा सांगते की राजा मांधाताने भगवान शिव पर्वतावर ध्यान करताना येथे कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि राजाने त्यांना येथे कायमचे वास्तव्य करण्यास सांगितले. तेव्हापासून येथे ओंकारेश्वर नावाच्या शिवलिंगाची स्थापना केली.

तिसर्‍या कथेबद्दल असे सांगितले जाते की, जेव्हा देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध झाले आणि सर्व देवांचा राक्षसांकडून पराभव झाला तेव्हा त्यांनी हताश होऊन भगवान शंकराची आराधना केली. देवांची खरी भक्ती पाहून भगवान शिवाने ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले आणि सर्व राक्षसांचा पराभव केला.

ओंकारेश्वर मंदिराच्या संदर्भात सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यांनुसार, ते आजपासून सुमारे 5500 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. पुराणात ओंकारेश्वर मंदिराचे वर्णन आपल्याला मिळते, यावरून आपल्याला त्याच्या प्राचीनतेची कल्पना येऊ शकते.

ओंकारेश्वर येथे नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम आहे. ओंकारेश्वरमध्ये दोन ज्योतिर्लिंगांची स्थापना केली आहे, एक अमलेश्वर ज्योतिर्लिंग आणि एक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग). ओंकारेश्वर हे मांधाता पर्वत आणि शिवपुरीच्या मध्यभागी तर ममलेश्वर ज्योतिर्लिंग दक्षिणेला वसलेले आहे.

या मांधाता पर्वताची परिक्रमा केली जाते. या परिक्रमेमध्ये जेथे नर्मदा व कावेरी यांचा संगम आहे त्या ठिकाणी ऋणमुक्तेश्वराचे छोटेसे मंदिर आहे तेथे ऋण मुक्तीसाठी डाळ अर्पण केली जाते.

नर्मदा मैया ची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर नर्मदा जल भगवान ओंकारेश्वर ला अर्पण केले जाते त्याशिवाय परिक्रमेची पूर्णता होत नाही.

प्रथम ओंकार ईश्वराचे दर्शन व नंतर अमलेश्वराचे दर्शन घेतले जाते.

View Details

भाविकांचे अभिप्राय

भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. नद्यांच्या दैवी प्रभावाची कल्पना-जाणीव आपल्या पूर्वसुरीना असल्यामुळे नद्यांबद्दल पूज्यभावना कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमित चालत आलेली आहे. अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा, पद्धती आणि रितीभाती आहेत. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वीतलावरची एकमेवाद्वितीय परंपरा आहे. नर्मदा परिक्रमेची !

Sanjay pawar

नर्मदा-परिक्रमा कुणी, का, कोणत्या वयात, कशी नि कशासाठी करावी ? नर्मदा-परिक्रमा कुणीही करावी. इथे जन्मजात वंश-जाती-धर्म-लिंगभेद, वय ह्यांची अजिबात आडकाठी नाही. नर्मदा-परिक्रमा का करावी ह्यांचं उत्तर असं की नर्मदा-परिक्रमा हे मानवी मनाच्या उन्नयनाचं/ सबलीकरणाचं - निर्मलीकरण साधणं हे आपल्या स्वत:शिवाय दुसऱ्या कुणाच्याच हातात नाही. दुसऱ्याचे अनुभव वाचून-ऐकून ते उमगलं कळलं तरी त्याची अनुभूती स्वत:ची स्वत:च घेणं केव्हाही श्रेयस्कर !

vijay surase

नर्मदा-परिक्रमेदरम्यान पाळावयाचे परंपरागत नियम आहेत त्यापैकी स्वत:ला पाळणे शक्य आहेत असे वेचक नियम परिक्रमा करणाऱ्यांनी स्वत:च ठरवून घ्यावेत किमान काही नियम तरी आवर्जुन पाळायचे ठरवावे नि ते निष्ठापूर्वक पाळावेत. मग परिक्रमा कितीही कालावधीची वा पद्धतीची, कुठल्याही मार्गानं पायी किंवा वाहनातून कशीही असू, परिक्रमेची वाटचाल नर्मदामाईप्रती अतीव आदरानं नि श्रद्धेनं करणं एवढंच महत्त्वाचं अन् पुरेसं आहे !

rahul patil

नर्मदा परिक्रमेदरम्यान मला जाणवलेली वा उमगलेली बाब अशी की परिक्रमावासीयांनी कोणता पेहेराव करावा असा कोणताच दंडक घालून दिलेला नसला तरी परंपरेनं चालत आलेला पेहेराव धोतर वा लुंगी नि सदरा ह्यामुळे परिक्रमावासीयांची जी प्रतीमा लोकांच्या मनात ठसलेली आहे तिला पेहेरावामुळे तडा जातो हे ध्यानात घेऊन शक्य असल्यास असा पेहेराव करावा. स्त्रियांचा पेहेराव पांढरं लुगडं-पोलकं असा असतो.

Sachin Patil

इथे एक महत्त्वाचा खुलास करावासा वाटतो की, ३०-४० वर्षापूर्वीच्या काळात गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील ही शूलपाणीची जंगलझाडीची वाट पार करताना भिल्लांकडून लुटलं जाण्याचं भय एवढंच संकट भेडसावायचं ! त्यानंतरच्या काळात नर्मदेवर सहा-सात धरणे निर्माण झाली. प्रामुख्याने शूलपाणी झाडीच्या टापून झालेल्या महाकाय धरणाच्या बांधकामामुळे सरदार सरोवर हा प्रचंड जलाशय निर्माण झाल्याकारणानं तिथली बहुतांशी जंगल-झाडी तर त्या जलाशयात बुडालीच, त्याचबरोबर पूर्वी अस्तित्त्वात असलेल्या परिक्रमेच्या सगळ्या पायवाटासुद्धा जलमय झाल्यानं हल्ली शूलपाणीच्या वाटेनं लुटलं जाण्याच्या भयापेक्षाही सर्वथा अतिअवघड नि जोखमीच होऊन बसलं आहे. खरं तर कुणीही, किमानपक्षी जे कुणी नर्मदा-परिक्रमेची वाट चालून आलेले आहेत नि ज्यांना परिक्रमेची वाट चालण्याबरोबरच त्यामागचा हेतू नि खरं मर्म उमगलेलं आहे अशांनी तरी परिक्रमेच्या वाटचालीच्या संबंधानं किंवा परिक्रमेदरम्यान पाळावयाच्या बाबतीत कोणताच अभिनिवेष आग्रहानं प्रतिपादन करण्याचं नि परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काही एक कारण नाही. तो त्यांचाच काय कुणाचाच अधिकार वा मिरासदारी नव्हे. तेव्हा परिक्रमा करणाऱ्या व्यक्तींनी अशा लोकांबरोबर चर्चा किंवा स्वत:च समर्थन करुन वादविवाद करू नये हे इष्ट ! नर्मदेची परिक्रमा ही नर्मदामाईच्या इच्छेनुसार तीच करवून घेते.

Kiran Patil

खरं तर हे भिल्ल लुटारू नाहीत ! ह्या परंपरेमागचं खरं कारण असं की, नर्मदा-परिक्रमा करत असताना परिक्रमावासीयांनी मोह, माया, आसक्ती, लोभ इत्यादींचा त्याग करणं अभिप्रेत आहे नि ते तसं सहजा-सहजी घडत नसल्यामुळे हा धडा गिरवण्याची नर्मदेच्या तटी अशी ‘सोय’ केली असावी.

Mayur Patil

नर्मदेच्या दक्षिण तटावरील राजघाट ते अंकलेश्र्वर दरम्यानच्या दीडशे किलोमीटर टापूतील शूलपाणीची तसेच उत्तरतटावरील गरुडेश्वर ते धर्मराय कोटेश्वर दरम्यानची जंगल-झाडीची वाट नर्मदेच्या तटानंच पार करणे हा काही परंपरावादी लोकांनी कळीचा मुद्दा बनवला आहे. ह्या वाटेनं जाणाऱ्या परिक्रमावासींना त्या परिसरातील भिल्ल केवळ लुटतंच नाहीत तर अक्षरश: नागवतात. परंपरावादी लोकांच्या मते असं लुटवून घेणं हा परिक्रमेदरम्यानच्या वाटचालीतील अटळ-अपरिहार्य भाग असल्यानं तो अनुभव प्रत्येक परिक्रमावासीना घेण अगत्याच आहे.

Dattatray Tambe